गणना प्रपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| आगरदांडा | प्रतिनिधी |

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गणना प्रपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधित अधिकारी व कर्मचारी नागरिकांकडून आवश्यक माहिती संकलित करत आहेत. या प्रक्रियेत नागरिकांनी अचूक व संपूर्ण माहिती देऊन आपले नाव मतदान यादीत पक्के करा, असे आवाहन मुरूड-जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी केले. मतदार यादीत आपले नाव पक्के करण्यासाठी दोन पासपोर्ट फोटो, आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर, जन्मतारीख, आई-वडिलांचे पूर्ण नाव व जुन्या ओळखपत्राचा क्रमांक लागणार आहे. ही कागदपत्रे आपल्या मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावी. तसेच, कोणतीही माहिती लपवू नये किंवा चुकीची देऊ नये. सर्वांनी निर्धारित कालावधीत गणना प्रपत्र भरून संबंधित कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. या करिता प्रत्येक शाळेत कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तरी त्या कॅम्पमध्ये सहभागी होऊन आपली अचुक माहिती द्या, असे असे आवाहन नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी केले.

Exit mobile version