सारनाथ बुद्ध विहारातील कार्यक्रम उत्साहात

| अलिबाग | वार्ताहर |

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अंतर्गत तालुका शाखा कर्जत व कर्जत तालुक्यातील सर्व विभाग शाखांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील सारनाथ बुद्ध विहार कशेळे येथे रविवारी (दि. 8) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कशेळे येथील राहुल युवक मंडळ व यशोधरा महिला मंडळ यांच्या व्यवस्थापनांतर्गत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष आयु किसन रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आद. महेंद्र मोरे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष स.जा. कवडे, महाराष्ट्र राज्य संस्कार सचिव के.के. गाडे, रायगड जिल्हाध्यक्ष संजय जाधव, माजी अध्यक्ष काशिनाथ कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष वसंत कांबळे, उद्योजक सुरेश सोनावणे, सेवानिवृत्त फॉरेस्ट ऑफीसर बी.डी. गायकवाड, संजय जाधव, रायगड जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, कर्जत तालुका कार्यकारिणी, आजी-माजी कार्यकर्ते, माजी श्रामणेर बौद्धाचार्य, कार्यकर्ते, सर्व विभागाचे अध्यक्ष, दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक तसेच राहुल युवक मंडळाचे सर्व पदाधिकारी, यशोधरा महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, तालुक्यातील तमाम धम्म बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आत्माराम खंडागळे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र गायकवाड संस्कार सचिव रायगड जिल्हा व कर्जत तालुका महासचिव रमेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व नियंत्रण कोषाध्यक्ष दिपक जाधव तालुका पदाधिकारी यांनी पाहिले.

Exit mobile version