| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी क्षेत्रातील कराडे बुद्रुक गावाच्या हद्दीत प्लॉट नं. एन 29, 30 येथे असणार्या बी.जे. एंटरप्रायझेस कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकांनीच कंपनीतील मशीनरीचे पार्ट चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजी एंटरप्रायझेस कंपनीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या एक्सलंट गार्ड फोर्स या सिक्युरीटी फोर्स एजन्सीने सुरक्षा रक्षक आरोपी राजेश झा, रजनीश झा व अनिलेश राय (सर्व राहणार बिहार) या तिघांनी संगनमत करून व आपल्या कंपनी रक्षणाचा गैरफायदा घेऊन कंपनीमध्ये पीडीलाईट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत ठेवण्यात आलेले 15 लाख 25 हजारांचे साहित्य व मशीनरीचे पार्ट स्वतःच्या फायद्याकरिता व लबाडीच्या हेतूने चोरून नेले आहेत. याबाबत जेरोम जॉन (चीफ ऑपरेटींग बीजी एंटरप्रायझेस) यांनी रसायनी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली असून, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.