ग्लोबिकॉनच्या दुर्गंधीमुळे जनता हैराण

प्रकल्पावर कारवाईची मागणी

| उरण | वार्ताहर |

उरणमधिल कोप्रोली,पिरकोण व बांधपाडा या तीन ग्रामपंचायत हद्दीत मालाची हाताळणी करणारे ग्लोबिकाँन टर्मिनल हा महत्त्वाचा खाजगी प्रकल्प आहे. सदर प्रकल्पावर प्रशासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याने मागील वर्षी ग्लोबिकाँन टर्मिनल (इंटरनँशल कार्गो टर्मिनल प्रा.लि.) या मालाची हाताळणी करणार्‍या प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने परिसरातील खाडीत विषारी केमिकल मिश्रित द्रव्ये सोडल्याने हजारो मासे मरण पावल्याची दुदैवी घटना घडली होती. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सत्यवान भगत यांनी महसूल विभाग आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली. परंतु सदर तक्रारीची दखल संबंधित प्रशासनाने न घेता उलट अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आव आणल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेसंदर्भात ग्लोबिकाँन टर्मिनल प्रकल्पाचे व्यवस्थापक अधिकारी सलिम शिकलगर यांच्या कडे संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला.

ग्लोबिकाँन टर्मिनलवर महसूल आणि प्रदुषण नियंत्रण मंडळ कारवाई करत नसल्याने वारंवार खाडीच्या पाण्यात व हवेत विषारी वायूची दुर्गंधी पसरत आहे. संबंधित प्रशासनाचे अधिकारी कारवाई करत नसतील तर आता जनतेच्या आरोग्याशी निगडित असलेल्या घटनेसंदर्भात, प्रश्‍नांसाठी न्याय कोणाकडे मागणार.

सत्यवान भगत
सामाजिक कार्यकर्ते

ग्लोबिकाँन टर्मिनल व्यवस्थापनाला सदर दुर्गंधी संदर्भात प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्यालयाकडून या अगोदर नोटीस बजावण्यात आली आहे

श्री अडसूळ
वरिष्ठ अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ



Exit mobile version