पोल्ट्रीतील उग्र वास बंद होईना; बीडखुर्द येथील ग्रामस्थ हैराण

। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील बीडखुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका पोल्ट्रिफार्ममध्ये प्रक्रिया करीत पिल्लांची उत्पत्ती केली जात असल्याचा व्यवसाय सुरू असून या व्यवसायामुळे येथील ग्रामस्थांना मोठ्या दुर्गंधीला सामोरे जावे लागत असल्याने या पोल्ट्रिफार्मच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ वर्ग हैराण झाले आहेत. या पोल्ट्री व्यवसायिकावर कारवाई यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा लोकप्रतिनिधी व शासन दरबारी पत्रव्यवहार करून ही योग्य कारवाई न झाल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहोत.

बीडखुर्द येथील कोंबड्यावर प्रक्रिया करीत पिल्ले निर्मिती करणार कारखाना नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने ग्रामस्थ विरोध पोल्ट्री व्यवसाय असा जणू संघर्ष सुरू झाला असून या संघर्षामुळे काही वेळा ग्रामस्थांना पोलीस ठाण्याची पायरी चढवी लागल्याने ग्रामस्थाचा आक्रोश दिवसेंदिवस अधिकच वाढू लागला असतानाही पोल्ट्री व्यवसायिकावर कारवाई करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी अनेकदा पत्रव्यवहार करून ही ग्रामस्थांनी न्याय न मिळाल्याने येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत आक्रमक पवित्रा घेताच सर्वानुमते पोल्ट्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला होता.

ग्राम सभेत पोल्ट्री बंदचा ठराव घेण्यात आल्या नंतरही पोल्ट्री व्यवसायिकावर कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस अधिकच वाढत असताना ग्रामस्थांच्या पत्रव्यवहाराची दखल तहसीलदार आयुब तांबोळी यांनी घेत खालापूर तहसील कार्यालयात पंचायत समितीचे अधिकारी, पोलीस प्रशासन, प्रदूषण मंडळ अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी, सामाजिक – राजकीय नेते, बीडखुर्द ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी, ग्रामसेवीका, ग्रामस्थ, महिला वर्ग, राजकीय नेते, पोल्ट्री व्यवसायिक मंडळी अशी संयुक्त बैठक घेतली होती.

यावेळी सर्व घडामोडींचा आढावा बैठकीत तहसीलदार आयुब तांबोळी यांनी घेत अधिकारी वर्गाला पोल्ट्रीचे अहवाल लवकरच सादर केल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार यांनी सांगितल्याने ग्रामस्थांचा संताप शांत झाला होता. परंतु 1 महिना उलटून होऊन गेला असला तरी अद्याप पोल्ट्री व्यवसायिकांवर कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थ संभ्रमात पडले असून या दुर्गंधीयुक्त पोल्ट्री व्यवसायिकावर कारवाई होणार की नाही असा प्रश्‍न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

Exit mobile version