चोरट्यांचा पाठलाग ठरला जीवघेणा

विषारी इंजेक्शन पाठीत खुपसल्याने पोलिसाचा मृत्यू

| मुंबई | वृत्तसंस्था |

माटुंगा स्थानकाजवळ नशेखोरांनी पोलिस कॉन्स्टेबलवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पोलिस कॉन्स्टेबलला चोरट्यांनी विषारी इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. विशाल पवार असे या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव आहे.

पोलीस कॉन्स्टेबल नेहमीप्रमाणे रविवारी रात्री कामावर जात होते. त्यावेळी ते लोकलमधून प्रवास करत होते. सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान ते लोकलच्या दरवाज्यात उभे राहून फोनवर बोलत होते. त्यावेळी एका व्यक्तीने पोलिस कॉन्स्टेबलला यांच्या हातावर फटका मारला. तो त्यांचा मोबाईल घेऊन पळाला होता. मोबाईल चोराला पकडण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबलला यांनी ट्रेनमधून उडी मारली. त्यांनी मोबाईल चोराचा पाठलाग सुरू केला होता. मात्र, पुढे दबा धरून बसलेल्या चोरांनी आणि नशेखोरांनी पोलिस कॉन्स्टेबल यांना घेरलं. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या नशेखोरांनी पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांना पकडून त्यांच्या पाठीत विषारी इंजेक्शन दिलं. तर, त्यांच्या तोंडातून लाल रंगाचं द्रव्य ओतलं होतं. यामुळे पोलीस कॉन्स्टेबल बेशुद्ध पडले. त्यांना तब्बल 12 तासांनी शुद्ध आली. परंतु, घरी गेल्यावर मात्र पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने ठाण्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी उपचारादरम्यान पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा मृत्यू झाला आहे. परंतु, मृत्यूपूर्वी कोपरी पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा जबाब घेतला होता. दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली होती. आता या प्रकरणाचा पुढील तपास दादर जीआरपीकडे वर्ग करण्यात आलं आहे. दादर जीआरपी करणार कलम 302 (हत्या) अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करत आहे.

Exit mobile version