विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे रोप वाढवावे- शिक्षणाधिकारी

। खरोशी । वार्ताहर ।

शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करणे गरजेच असल्याचे मत शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी व्यक्त केले. जिल्हा खासगी प्राथमिक शाळा कर्मचारी संघटनेच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम अलिबाग तालुक्यातील पवेळे येथे करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी वड, पिंपळ, तुळस, कडूनिंब आदी विविध 51 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी संदीप कदम, संतोष शेडग, दीपा परब, अक्षय पाटील, साईनाथ गावंड, मीनाक्षी कर्वे, सुधाकर जैवळ, यशवंत मोकल, धनाजी घरत, मेघा मोरे, ज्ञानेश्‍वर ठाकूर, सचिन सावंत, दीपक सूर्यवंशी, राजेश पाटील, राजेंद्र म्हात्रे यांच्यासह विविध तालुक्यांचे तालुकाप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक धाटावकर यांनी केले. प्रमोदिनी जाधव यांनी गायन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोदिनी पाटील, सुनिल गायकर, शशिकांत पाटील, ऋतुजा पाटील, भावेश्री वाळंज, सुप्रिया ठाकूर, संदीप पाटील, संतोष मढवी, मानसी ठाकूर आदीनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन देवेंद्र केळूसकर यांनी तर आभार सुधाकर जैवळ यांनी केले.

Exit mobile version