माथेरानच्या राणीची जागतिक वारशासाठी धडपड

?

| नेरळ | वार्ताहर |
मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डकडून नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन या जागतिक वारसा मिळावा म्हणून 2012 पासून युनोस्कोचा वारसा मिळविण्याच्या तयारीत असलेल्या मिनीट्रेनला जागतिक वारसा मिळविण्यासाठी दाखल झालेल्या नामांकनानुसार पाहणीसाठी युनोस्कोची टीम येणार आहे. मात्र, मिनीट्रेनची ओळख असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरूच नाही. दुसरीकडे जागतिक वारसा बनण्याच्या तयारीत असलेल्या मिनीट्रेनची इंजिने आज प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम आहेत काय? हादेखील मोठा प्रश्‍न आहे. 1907 मध्ये सर आदमजी पीरभॉय यांच्या आर्थिक तरतुदींमधून आणि नेरळ-माथेरान- नेरळ मिनीट्रेन हा 21 किलोमीटरचा मार्ग शोधून काढून साकारला दोन वर्षे खडतर प्रयत्न केल्यानंतर मिनीट्रेन मार्गावर आली आणि ही माथेरान राणी म्हणून संबोधली जाऊ लागली. मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेली ही माथेरान राणीला जागतिक वारसा मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आज नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची स्थिती काय आहे? याचा अभ्यास हेरिटेज नियमावलीसाठी प्रयत्न करणार्‍या मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला याबाबत माहिती आहे किंवा नाही? हा प्रश्‍न आहे. मिनीट्रेनचा 21 किलोमीटरच्या ट्रॅकसह मिनीट्रेनसाठी वापरली जाणारी वाफेवरील तसेच डिझेल इंजिने, त्याचवेळी एअर ब्रेक प्रणालीवर चालणारी इंजिने यांचा समावेश जागतिक वारसामध्ये व्हावा यासाठी मध्य रेल्वेचा पर्यटन सुरु आहे. त्यानंतर मिनीट्रेनची स्थानके हीदेखील हेरिटेज नामावली मिळविण्यासाठी प्रयत्नशील होती. मिनीट्रेनच्या मार्गावरील 200 हून अधिक वेडीवाकडी वळणे आणि कमी रुंदीचा नॅरोगेज मार्ग यामुळे जागतिक वारसा मिळविण्यात ही ट्रेन यशस्वी होईल, असे वाटले होते. पण, मध्य काळात अनेक वेळा पावसाळ्यानंतर नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची वाहतूक बंद पडत असते.

पावसाळ्यात भूस्खनन होऊन नॅरोगेज मार्ग वाहून जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने मिनीट्रेनला हेरिटेज मानांकन अद्याप मिळाले नाही. नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन मार्गावरील अमन लॉज-माथेरान यादरम्यान चालवल्या जाणार्‍या शटल सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मिनीट्रेनचे ब्रॅण्डिंग करायला घेतले आहे. त्यासाठी माथेरान येथे मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डकडून 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी माथेरानची संस्कृती पर्यटकांना दाखविण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. मात्र, मध्य रेल्वे ज्या हेरिटेज नामांकन मिळविण्याठी धडपड करीत आहे, त्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनचे आकर्षण असलेला नेरळ-माथेरान प्रवास प्रवाशांना करता येत नाही. दुसरीकडे मिनीट्रेनला लावली जाणारी वाफेवरील इंजिने अनेक वर्षे बंद अवस्थेत नेरळ लोकोमध्ये पडून आहेत. मिनीट्रेनचे विशेष असलेली माथेरान राणी चालविली जात असल्याने मध्य रेल्वेची हेरिटेज नामांकन मिळविण्यासाठी सुरु असलेली धडपड कशासाठी? हा प्रश्‍न आहे. रेल्वेच्या आयआरसीटीसी या वेब साईटवरदेखील मिनी ट्रेनबद्दल कोणतेही स्टेटस नाही आणि त्यामुळे परदेशी पर्यटक मिनीट्रेन बंद असल्याने या ठिकाणी वळत नाहीत, ही वस्तुस्थिती असतानादेखील मध्य रेल्वेची ही धावपळ कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

आधी वाहतूक सुरु करा!
पूर्वी मिनीट्रेन आणि मिनीट्रेन चे वाफेवरील इंजिन यांचा अभ्यास करण्यासाठी मिनीट्रेनचे परदेशी अभ्यासक हे नेरळ-माथेरान मार्गावर खास गाडी बुक करून येत असत. फक्त त्यांच्यासाठी नेरळ-जुम्मापट्टी यादरम्यान मिनीट्रेनची विशेष फेरी आयोजित केली जायची. मात्र, गेली काही महिने नेरळ येथून गाडीच चालविली जात नाही आणि त्यात या गाडीचे ऑनलाईन बुकिंग करता येत नसल्याने मिनीट्रेन परदेशी पर्यटक येणेच गेली पाच वर्षांत बंद झाले आहे. असे असताना मिनीट्रेन हेरिटेज होईलच कशी, हा प्रश्‍न असून, मिनीट्रेनबाबत आधी मध्य रेल्वेने प्रशासनाने थेट वाहतूक सुरु केली पाहिजे आणि नंतरच हेरिटेज नेमकं मिळविण्यासाठी धावपळ करायला हवी?

Exit mobile version