पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावावा

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
उरण | वार्ताहर |
जेनएनपीटी प्रकल्पग्रस्त शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) गावाचा पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावावा आणि स्थानिक तरुणांना नोकरीत भरती करुन घ्यावे, असे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ग्रामस्थांनी दिले. सिडको भवन येथे गुरुवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी नवी मुंबईच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करुन जेएनपीटी प्रकल्पग्रस्त शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावावा आणि तरुणांना जेएनपीटीमध्ये नोकर भरती करण्यात यावी, असे उपमुख्यमंत्रीना सांगून निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामसुधारणा मंडळाचे उपाध्यक्ष आणि एकता 24 तास पत्रकार मंगेश कोळी, शिवतेज महिला मंडळच्या अध्यक्ष शर्मिला कोळी, ठाणे अरुणोदय पत्रकार तसेच बहुजन समाज पार्टीचे उरण विधान सभा महासचिव नरेश कोळी यांनी निवेदन दिले. हनुमान कोळीवाड्याचा प्रश्‍न मार्गी लाव, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित यांनी दिले.

Exit mobile version