शेतकर्‍यांच्या भाजीपाल्याचा प्रश्‍न ऐरणीवर

50 एकरात केली जात होती शेती, बंधार्‍यात आता पाणी गेले वाहून
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवरील बोरगाव येथे याच वर्षी बांधलेल्या सिमेंट बंधार्‍यात भरपूर पाणी साठले होते. मात्र त्या सिमेंट बंधार्‍यात पाणी साठवून ठेवण्यासाठी लावलेल्या लोखंडी प्लेट या 13 जानेवारीच्या रात्री तुटल्या आणि त्या बंधार्‍यातील सर्व पाणी वाहून गेले. दरम्यान, या बंधार्‍याच्या पाण्यावर किमान 50 एकर जमिनीवर भाजीपाला शेती केली आहे. त्या शेतीसाठी आता पाणी कुठून आणायचे ? असा प्रश्‍न भाजीपाला उत्पादक शेतकरी यांना पडला आहे. जलसंधारण विभागाने 73 लाख खर्च करून हा बंधारा बांधला असून अद्याप कोणत्याही प्रकारचे बिल अदा करण्यात आले नाही अशी माहिती उपअभियंता कार्यालयाने दिली आहे.


बोरगाव येथे पोश्री नदीवर जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 83 मीटर लांबीचा सिमेंट बंधारा 2021 मध्ये बांधला होता. त्या बंधार्‍यात तब्बल 700 मीटर अंतरामध्ये पाणी साठून राहिले होते.त्यामुले बोरगाव मधील शेतकर्‍यांनी तेथे असलेल्या शेतजमिनीत भाजीपाला पिकाची लागवड डिसेंबर महिन्यापासून करण्यास सुरुवात केली आहे. तेथील 5- एकर जमिनीवर बोरगावातील 30 शेतकर्‍यांनी भाजीपाला लावण्यास सुरुवात केली असून त्या भाजीपाला पिकासाठी सिमेंट बंधार्‍यातील पाणी नेण्याची तजवीज देखील शेतकर्‍यांनी कृषिपंप लावून केली आहे.आता साधारण सहा ते आठ इंच उंचीची रोपे शेतात डवरण्यास सुरुवात झाली असून शेतकरी गेली दोन महिने शेतांची मशागत करण्यात व्यस्त होता या सिमेंट बंधार्‍यामुळे शेताजवळ पाणी मिळाले असल्याने बोरगावातील अनेक शेतकर्‍यांनी भाजीपाला शेतीकडे आपला कल वळविला होता. मात्र 13 जानेवारीच्या रात्री अचानक त्या सिमेंट बंधाऱयाला असलेल्या चार लोखंडी प्लेट पैकी एका लोखंडी प्लेट मधून पाणी गळती झाली आणि त्यामुले बंधार्‍यातील सर्व पाणी आज सकाळपर्यंत वाहवून गेले आहे. त्यामुळे त्या सिमेंट बंधार्‍यात आता पाणीच शिलक्क राहिले नाही.


या बंधार्‍याला पाणी अडवून ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी प्लेट या गंजलेल्या असल्याने त्यातील पाण्याच्या मध्यभागी असलेली लोखंडी प्लेट मधून पाणी बाहेर पडू लागले आणि रात्रीतून सर्व पाणी वाहून गेले आहे. त्याचा परिणाम सिमेंट बंधार्‍यात साठून राहिलेले 700 मीटर अंतरावरील पाणी वाहून गेले आहे.त्याचा परिणाम आता त्या भागात बंधार्‍याचे पाणी मिळणार म्हणून शेती करणार्‍या शेतकर्‍यांना आपला भाजीपाला कसा जगावयाचे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आता जलसंधारण विभागाकडून त्या ठिकाणी तुटलेल्या लोखंडी प्लेट बदलून पुन्हा पाणीसाठा होईल का?याची चाचपणी स्थानिक शेतकर्‍यांकडून घेतली आहे. पोश्री नदी ज्या भीमाशंकर अभयारण्य भागातून वाहत येते आणि त्यामुले पुन्हा सिमेंट बंधारा पनयने भरेल काय ?याची माहिती जलसंधारण विभाग गेहत आहे. आता देखील नदीमद्ये थोड्याफार प्रमाणात पाणी वाहत असून ते पाणी साठवून बंधारा पुन्हा पाण्याने भरेल काय? याचा अभ्यास केला जात आहे.त्यामुले शेतकर्‍यांना भाजीपाला पिकासाठी डफावर दूरवरून पाणी आणण्याची वेळ येणार नाही असे आश्‍वासन जलसंधारण विभागाने दिले आहे.

Exit mobile version