राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याच्या घरी १०९ वेळा पडलेल्या छाप्याची विश्वविक्रमात नोंद होऊ शकते – सुप्रिया सुळे

। मुंबई । वृत्तसंस्था ।
ईडीकडून राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे य़ांनी टीका केली आहे. अनिल देशमुख यांच्या घरी १०९ वेळा छापे टाकण्यात आले. १०८ वेळा ईडीला काही मिळाले नाही का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच एकाच व्यक्तीच्या घरी इतक्या वेळा छापे टाकण्याचा हा विश्वविक्रम होऊ शकतो अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Exit mobile version