| पेण | वार्ताहार |
पेण तालुक्यातील गेली 10 वर्ष विकास कामांच्या जोरावर कायापालट झालेली ग्रामपंचायत म्हणजे रोडे ग्रामपंचायत. या वेळेला इतर सर्व पक्ष विरुध्द शेकापक्ष अशी लढत रोडे ग्रामपंचायत मध्ये पहायला मिळत आहे. शिंदे गटातील मा.सदस्याने कब्रस्थान मध्ये केलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाकरे गट शेकापक्षाच्या सोबत आहे.
रोडे ग्रामपंचायत ही तालुक्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात असून मा.सरपंच स्वप्निल म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हया ग्रामपंचायतची निवडणूक लढविली जात आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना स्वप्निल म्हात्रे यांनी सांगितले की, विधानसभा मतदार संघामध्ये विधान परिषदेला भाजपचा कार्ड चालत असताना देखील माझ्या ग्रामपंचायती मध्ये 150 मतांची आघाडी होती. या ग्रामपंचायतच्या निवडणूकीमध्ये सर्व पक्ष एकत्र येउन आमच्या विरुध्द लढत आहेत, परंतु सरपंचासह सात ही जागा मोठया फरकाने आम्ही निवडून आणनारच. आम्ही विकास कामे ऐवढी केलेली आहेत की विरोधकांना मतदार स्विकारूच शकत नाहीत. पुन्हा आम्ही विजयाची हॅट्रिक पुर्ण करून निर्विवाद लाल बावटयाला भगव्याची साथ मिळेल. असे स्वप्निल म्हात्रे यांनी प्रचारा दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.