तीन असणार आणखी अत्याधुनिक
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय वायुदलातील सर्वात अत्याधुनिक मध्यम वजनाची लढाऊ विमाने म्हणून राफेल लढाऊ विमान ओळखलं जातं. फ्रान्स देशाचे तंत्रज्ञान असलेल्या राफेल लढाऊ विमानांचा ताफा येत्या एप्रिल महिन्यात पुर्णत्वास जाणार आहे. आत्तापर्यंत 30 राफेल विमाने भारतीय वायूदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन राफेल विमाने दाखल होणार असून एप्रिल महिन्यात उर्वरीत तीन विमाने दाखल होणार आहे. यापैकी शेवटची तीन राफेल विमाने ही आणखी अत्याधुनिक असणार आहे, भारतीय वायूदलाच्या मागणीनुसार दाखल होणार्या शेवटच्या तीन राफेलमध्ये आवश्यक बदल केले जात आहेत.
2010 नंतर विविध चाचण्या घेतल्यावर विविध लढाऊ विमानांमधून राफेल विमानांची निवड करण्यात आली आणि 2016 मध्ये राफेल करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रत्यक्षात जुलै 2020 पहिले राफेल भारतीय वायूदलात दाखल झाले. हे राफेल जरी अत्याधुनिक असले तरी बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार, तंत्रज्ञानानुसार काही बदल करावे लागतात. आता गेली दोन वर्ष भारतीय वायूदल राफेलचा पुरेपुर वापर करत असून यामध्ये काही बदल सुचवले आहेत जे शेवटच्या तीन राफेलमध्ये केले जातील. तशी तरतूद करार करतांना करण्यात आली आहे.