। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील सारडे विकास मंच आणि कोमणादेवी ऑक्सिजन पार्कतर्फे मुलांना गड किल्ल्यांचे महत्व आणि माहिती व्हावी यासाठी गड किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील 56 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी मुरुड-जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारणारा सुशांत म्हात्रे हा प्रथम क्रमांकाचा, सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारणारा श्रीवेद म्हात्रे हा द्वितीय क्रमांकाचा तर रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारणारा ओम पाटील हा उत्तेजनार्थ पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे.
यावेळी धिरेंद्र ठाकूर यांनी शिवरायांच्या गडकिल्ल्यांची माहिती दिली. तर, किशोर पाटील यांचा ‘स्वर हे माझे’ हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविणार्या विजेत्या स्पर्धकांची शैक्षणिक फी राकेश कडू (सोनारी) यांच्यामार्फत भरली जाणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निवास गावंड, तुकाराम गावंड, हरिश्चंद्र म्हात्रे, संतोष जोशी, सचिन पाटील, विजय पाटील, प्रशांत म्हात्रे, रणिता ठाकुर, डॉ.कौस्तुभ पाटील, किशोर पाटील, हरीश म्हात्रे, अमोल पाटील, राजेश पाटील, गणेश पाटील, नशीब पाटील, निलेश म्हात्रे, उज्वल पाटील, अदिती पाटील, अपूर्वा पाटील, रिया म्हात्रे, ओम, बबली, आक्षाता या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.