हाशिवरे महाविद्यालयाचा निकाल 99 टक्के

दीक्षा पाटील 91.40 टक्के मिळवून प्रथम
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील हाशिवरे हितवर्धक मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून, महाविद्यालयाचा निकाल 99 टक्के लागला. सेमी इंग्रजी वर्गाचा निकाल 100 टक्के लागला आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षेत एकूण 101 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यापैकी 100 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये दीक्षा दिनेश पाटील या विद्यार्थिनीने 91.40 टक्के मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक, तर हर्षा यशवंत पाटील 87.20 टक्के मिळवत द्वितीय, तर अथर्व आदेश पाटील या विद्यार्थ्याने 85.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

दरम्यान, वैजाळी इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल 100 टक्के लागला असून, एकूण 30 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. या शाळेतून आदित्य मनोज मोकल या विद्यार्थ्याने 71.20 टक्के मिळवत प्रथम क्रमांक, वेदिका मनोज पाटील 69.40 टक्के द्वितीय, रुणाली राजेंद्र पाटील या विद्यार्थिनीने 68.20 टक्के मिळवून विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. हाशिवरे मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र मोकल, उपाध्यक्षा सरोज डाकी, सचिव ज्ञानेश्‍वर मोकल, सचिव अनिल मोकल, खजिनदार शैलेश मोकल, सल्लागार सुबोध मोकल तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे तसेच विद्यालयाचे प्राचार्य सदानंद पाटील, पर्यवेक्षक बी.डी. गायकवाड, वैजाळी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा धसाडे त्याचबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Exit mobile version