। अलिबाग । वार्ताहर ।
दहावीच्या परीक्षेत जी.के.स्कूल, वाशी, ता. पेण शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. या विद्यालयाचा विद्यार्थी हर्षवर्धन शिरीष कावरे हा 85.20 टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम आला. या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष प्रसाद पाटील, मुख्याध्यापिका वैशाली डोईफोडे, तसेच इतर मान्यवर व शालेय कमिटी यांनी हर्षवर्धन याचे अभिनंदन केले. हर्षवर्धन हा वाशीतील निवृत्त शिक्षक मोहन कावरे यांचा नातू असून, त्याच्या यशाबद्दल विविध स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.