रोहा तालुक्यातील अनेक शाळांचा निकाल 100 टक्के

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील अनेक शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. पण उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा विचार करता विद्यार्थ्यांच्या गुणांचा टक्का मात्र घसरला असल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे या विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अभ्यास करता आला नव्हता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाईल, इंटरनेट या सुविधांचा असलेला अभाव यामुळेदेखील विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणात कमी झाल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.


तालुक्यातील पीएनपी तळाघर, रोहा पब्लिक स्कुल, एम.बी. पाटील, तिसे हायस्कूल, चणेरा न्यू इंग्लिश स्कुल, कोकबन हायस्कूल, अंजुमन हायस्कूल, खांब, चिले हायस्कूल, विठ्ठलवाडी हायस्कूल, कुडली हायस्कूल, ऐनघर हायस्कूल तसेच एमपीएसएस हायस्कूल कोलाड या शाळांचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून, मेहेंदळे हायस्कूल 98.68 टक्के, साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव 77.43, आश्रमशाळा सानेगाव 96.97 टक्के, आरे बुद्रुक शाळा 87.50, कोलाड हायस्कूल 93.75, सुतारवाडी माध्यमिक विद्यालय 97.56 तर धाटाव येथील पांडुरंगशास्त्री आठवले माध्यमिक विद्यालयाचा निकाल 96.42 टक्के लागला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version