। अलिबाग । प्रतिनिधी ।
दहावीच्या निकालात जिल्ह्यातील सर्व पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, संस्थंचा निकाल 98 टक्के लागला आहे. पीएनपी एज्युकेशन सोसायटीमध्ये होली चाईल्ड इंग्लिश मीडिअम स्कूल वेश्वीची विद्यार्थिनी सिया राजेश अग्रवाल 95 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम आली. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले आहे.