पीएनपी बारावीचा निकाल 100 टक्के

| अलिबाग | प्रतिनिधी |

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पीएनपी एज्युकेशन सोसायटीचा आर्ट्स, कॉमर्स व सायन्सचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. संस्थेमधून साक्षी सचिन अर्लेकर ७७.१७ टक्के गुण मिळवून प्रथम आलेली आहे.

कॉमर्स मध्ये अभिषेक संतोष मोर्या 76.17 टक्के गुण मिळवून प्रथम, भक्ती किशोर गुरव 73.83 टक्के गुण मिळवून द्वीतीय तर तनुजा संपत कोठारे 66.50 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

आर्ट्स मध्ये जय रविंद्र पेडणेकर 76.17 टक्के गुण मिळवून प्रथम, पूर्वा प्रशांत म्हात्रे 75.33 गुण मिळवून द्वितीय तर अस्ता मिलिंद घटवाई 64.33 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

तर सायन्स मध्ये साक्षी सचिन अर्लेकर 77.17 गुण मिळवून कॉलेज मध्ये आणि संस्थेत प्रथम, रेणुका अरुण पिल्लई 73.17 गुण मिळवून द्वितीय आणि अनुश्री किशोर वेखंडे 71.17 गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष आमदार भाई जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, प्राचार्य संजय मिर्जी इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version