पीएनपी संस्थेत श्रीराज मोहिते 97.40 % गुण मिळवून प्रथम
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील सर्व पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे. पीएनपी एज्युकेशन सोसायटीमध्ये होली चाईल्ड स्टेट बोर्ड स्कूल वेश्वीचा विद्यार्थी श्रीराज मोहिते 97.40 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम, माध्यमिक शाळा वेश्वी गोंधळपाडा मराठी माध्यम शाळेचा विद्यार्थी मयूर भानूदास खरात 94 टक्के गुण मिळवून संस्थेत द्वितीय तर निधय सुरेश गोंधळी 93 टक्के गुण मिळवून संस्थेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे.
माध्यमिक शाळा वेश्वी गोंधळपाडा मराठी माध्यम शाळेचा विद्यार्थी मयूर भानूदास खरात 94 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम, निधय सुरेश गोंधळी 93टक्के गुण मिळवून द्वितीय, तर माध्यमिक शाळा मिठागर शाळेची विद्यार्थिनी अंतरा राजेंद्र नाक्ती 91टक्के गुण मिळवून तृतीय आलेली आहे.
पीएनपी इंग्रजी माध्यमांमध्ये होली चाईल्ड इंग्लिश मिडियम स्कूल वेश्वी आणि जी. जे. एम. स्कूल खालापूरचा निकाल 100टक्के लागला असून, इंग्रजी माध्यमांमध्ये होली चाईल्ड इंग्लिश मिडियम स्कूल वेश्वीचा विद्यार्थी श्रीराज सचिन मोहिते 97.40 टक्के गुण मिळवून शाळेत आणि संस्थेत प्रथम आलेला आहे. मनस्वी जितेंद्र मळेकर 91टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय तर मयंक सरपाळे 87.20 टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले.







