| पोलादपूर | प्रतिनिधी |
रयत शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिरामध्ये 2000-01 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दहावित शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी गेल्या 7-8 वर्षांपासून स्नेह मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. अखेरीस सर्वांच्या प्रयत्नांमधून रविवारी (दि.29) मोरगिरी रोड मैत्री गार्डन येथे स्नेहमेळावा यशस्वी झाला. या शाळेचे शिक्षक बी.जी. पाटील यांनी स्नेहमेळाव्यास प्रेरित केल्यामुळे सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अस्मिता तलाठी व मुख्याध्यापक शेठ यांनी या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत मनोगत व्यक्त करत मराठी माध्यमिक शाळेचे महत्त्व आणि आजची बदलत चाललेली जीवनशैली याविषयी आपले मार्गदर्शन केले. हा स्नेह मेळावा यशस्वी करण्याकरिता सुहास कळमकर, हरीश मोरे, सारिका बोरकर-महाडिक, स्वाती दीक्षित-महामुनी या सर्व विद्यार्थ्यांनी संपर्क साधत नियोजनात पोलादपूरमधील स्थानिक माजी विद्यार्थी प्रसाद शहा, निलेश आंबेतकर, निहाल कुडाळकर आणि चिंचवड-पुणे येथील विजयेंद्र कोळसकर या सर्वांना सोबत घेऊन स्थानिक रहिवासी डेकोरेशन क्षेत्रातील व्यावसायिक अमित दरेकर, हॉटेल व्यवसायिक अमित भुवड, फोटोग्राफर वैभव साळवी या सर्वांचे मनापासून आभार मानले.






