भात पिकाला दिलासा मिळाला

। रसायनी । वार्ताहर ।

रसायनी परिसरात पावसामुळे भाताच्या पिकाला दिलासा मिळाला आहे. पावसाने दहा दिवस दडी मारली होती. त्यामुळे भाताचे पिक सुखू लागले होते. पुन्हा पाऊस पडण्याची शेतकरी आतुरतेनं वाट पहात होते. सिंचनाचा आधार असलेल्या काही शेतकर्‍यांनी पिकाला पाणी दिले. पिकासाठी पाऊस पडण्याची खुप गरज होती. दरम्यान काल दुपारी मध्यम, हलका पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्‍यांना आनंद झाला आहे.

यंदाच्या खरिपाच्या हंगामासाठी सुरूवातीपासून वेळेवर पाऊस पडला आहे. त्यामुळे पेरणी आणि लावणीची काम वेळेवर झाली आहे. भाताचे पिक चांगले आले असुन हिरव्यागार पिकांनी शेत बहरली आहे. काही दिवसापूर्वी पावसाने दडी मारली. तसेच पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला शेतकरी अजून काळजीत पडले होते. पिक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांनी कीडनाशक औषध फवारणी केली. काल झालेल्या पावसामुळे भाताच्या पिकाला आणि भाजीपाल्याचे पिकाला दिलासा मिळाला आहे. पाऊस पडेल आशी शक्यता जागृत शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. परिसरात वासांबे मोहोपाडा, चावणे, आपटे, वडगाव पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताचे पिक घेत आहे. तसेच सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पिक घेत आहे.

Exit mobile version