बळीराजा सुखावला
तळे | वार्ताहर |
7 जूनला कोकणासह सर्वत्र मान्सूनने हजेरी लावली. उन्हाळ्याच्या उकाड्यातून दिलासा मिळत असताना शेतकरी वर्गाची पेरणीसाठी कामे आटोपली होती. पाऊस छान पडत असल्यामुळे रोपेही सुंदर उभी राहिली असताना ऐन लावणीच्या हंगामात पावसाने दडी मारली आणि शेतकरीराजाला चिंतेत टाकले. काही ठिकाणी तर शेतात पाणी नसल्यामुळे रोपे सुकू लागली होती. आठ एक दिवस दडी मारलेल्या पावसाचे गुरुवारी सायंकाळी आगमन झाले आणि चिंतेत पडलेला शेतकरी सुखावला आहे. शुक्रवारपासून सर्वत्र लावणीची कामे जोरात सुरू झाली आहेत. सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.