कळंबोळीत खड्यात अडकली रिक्षा

| पनवेल । वार्ताहर ।

कळंबोली वसाहत आणि लोखंड बाजार चौकातील भल्या मोठ्या खड्यात रविवारी दुपारी तीन आसनी रिक्षाचे पुढचे चाक रुतले. खड्यात साचलेल्या पाण्यामुळे रिक्षाचालकासह प्रवाशांना अथक परिश्रम केल्यानंतर रिक्षा खड्यातून बाहेर काढण्यात यश आले. विशेष म्हणजे लोखंड बाजारात प्रवेश करण्यासाठीच्या मुख्य चौकात पावसाळी पाणी साचत असल्याने वाहनचालकांना येथून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते.

वाहनचालकांनी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही येथील पाणी साचण्याची समस्या दूर झालेली नाही. संबंधित रस्ते आणि उड्डाण पुलाच्या बांधणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी प्रशासनाने पावसाळी पाणी साचण्याची समस्या ध्यानात न घेता येथे पावसाळी पाण्याच्या निच-यासाठी नियोजन केले नाही. पनवेल पालिकेने येथे साचलेले पाणी काढण्यासाठी मोटार पंप लावलेला आहे.

Exit mobile version