स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर मिळणार हक्काचा रस्ता

माडभूवन, कोरलवाडीच्या रस्त्याचा नारळ फुटला
। रसायनी । वार्ताहर ।

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आपटा ग्रामपंचायत हद्दीतील माडभूवन आणि कोरलवाडी आदिवासी वाड्यांच्या हक्काच्या रस्त्याचे भूमीपूजन पार पडले. रस्त्याचा नारळ फुटल्याने आदिवासी बांधवांच्या चेहर्‍यावर आनंदाचे हास्य दिसून आले.
यावेळी माडभुवन येथील भूमीपूजन जि.प. सदस्य ज्ञानेश्‍वर घरत, तर कोरलवाडी येथील रस्त्याचे भूमीपूजन ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.यातील माडभुवन रस्त्यासाठी रत्नाकर घरत यांचेही योगदान आहे. यावेळी आदिवासी बांधवांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन आभार मानले. आपल्यासाठी रस्ता होणार असल्याने महिलांनी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर घरत यांचे औक्षण केले.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील भानुषाली ,वनपरिक्षेत्र कल्ले परिमंडळाचे वनपाल जी.पी. चव्हाण, आपटा सरपंच निकिता भोईर, ग्रामविकास अधिकारी शेंडगे, उपसरपंच ऋषभ धुमाळ, पांडुरंग भोईर, विजय मुरकुटे,दशरथ गायकर, डॉ. आरिफ दाखवे, ज्ञानेश्‍वर मोरे, रत्नाकर घरत, सचिन गावंड, तेजस चव्हाण, अब्रार मुल्ला यांच्यासह आपटा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version