ठेकेदाराच्या दलालगिरीत बुडाला रस्ता

| उरण | वार्ताहर |

उरण-करंजा रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि इतर ग्रामपंचायत हद्दीत काही ठिकाणी डांबरीकरणाचे काम भर पावसातही धडाक्यात सुरू आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचलेले असतानाही मशीन सुरू असून, रोलर फिरवला जात आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या दलालगिरीने सरकारी तंत्रज्ञानाची थेट थट्टाच केल्याचे स्थानिक नागरीकांमधून बोलले जात आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अधिकारी, अभियंते आणि तथाकथित राजकीय नेत्यांना कमिशन सिस्टिम व्यवस्थित सुरू असल्यामुळे या सर्व प्रकाराकड डोळेझाक करत असल्याचा अरोप देखील स्थानिकांकडून केला जात आहे. सामान्य नागरिकांच्या पैशातून कोट्यवधींचा निधी खर्च करून बनणारे हे रस्ते, मे महिन्यातच पुर्ण होणे गरजेचे होते. परंतु, हे काम भर पावसात देखील चालु असल्याने सरळ सरळ संबंधित अधिकाऱ्यांसोबत हात मिळवणीचा भ्रष्टाचार असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे या कामाची तात्काळ चौकशी करूप संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version