बामणगावमधील रस्ते होणार चकाचक

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील बामणगाव गावातील सर्व अंतर्गत रस्त्यांसाठी शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला. शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते शनिवारी विजयमादशमीच्या दिवशी (दि.12) या रस्त्याच्या कामाचा भुमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्यामुळे बामणगाव गावांतील अंतर्गत रस्ते चकाचक होणार आहेत.

यावेळी शेकाप अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमित पाटील, बामणगावचे माजी सरपंच रविंद्र भगत, माजी उपसरपंच नरेंद्र उळे, माजी उपसरपंच संजय ठाकूर, विद्यमान सदस्य सतिश भगत, सदस्या काविरी मानकर, अनंत थळे, निकिता राऊत, सामाजिक कार्यकर्ते जगदीश भगत, गजानन पाटील आदी मान्यवरांसह शेकापचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. बामणगाव गावांतील अनेक रस्ते खराब झाले होते. सामाजिक कार्यकर्ते अमित (राम) थळे यांनी ही बाब शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या मागणीनुसार जयंत पाटील यांनी बामणगावमधील रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. गावातील सर्व रस्ते डांबरीकरण होणार आहेत. त्यामुळे गावातील विकासाला गती मिळणार असल्याचा विश्‍वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version