निवडणुकीच्या कागदपत्रांसाठी इच्छुकांची धावपळ

। तळा । वार्ताहर ।
नगरपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची सुरुवात बुधवार (दि.1) पासून झाली आहे. निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरु झाली. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आरक्षणामुळे इच्छुकांचा भ्रमनिराशा झाली असला तरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले कामाला लागले आहेत. नामांकन दाखल करण्यासाठी विविध प्रमाण पत्रासह नगरपंचायतीची थकबाकी, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता कर वगळता इतर कराबाबत थकबाकी नसल्याचा व नगरपंचायतीचा ठेकेदार नसल्याचा स्वंयघोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्‍वभुमी नसल्याचे प्रमाणपत्र, खर्चाचे हमीपत्र, 12 सप्टेंबर 2001 नंतर दोन पेक्षा जास्त अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र यासह अन्य प्रमाणपत्राची गरज असल्याने राखीव प्रभागासह सर्वसाधारण गटातूनही निवडणूक लढवण्याची तयारी करीत असणार्‍यांची धावपळ सुरू झाली आहे. निवडणूक लढवणार्‍यासाठी नगरपंचायतीची अनेक प्रमाणपत्राची गरज असून या निमित्ताने नगरपंचायत अधिकारी वर्गाकडे संपर्क करुन कागदपत्रे काढून घेतले जात आहेत. गावच्या ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा बिगूल वाजला असून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. कधी नव्हे ते यंदा गावचे कारभारी होण्यासाठी तरुण मंडळी इच्छुक असल्याने निवडणूक लढवणार्‍यांची संख्या वाढली आहे. गावागातील इच्छुक कर भरण्यासाठी थेट ग्रामपंचायतमध्ये येत असल्याने कोरोना काळात अर्थिक अडचणीत आलेल्या ग्रामपंचायतींना आर्थिक मदतीचा हात मिळणार आहे.

Exit mobile version