शेतकऱ्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

किसान अस्थिकलशाचे गेटवे ऑफ इंडिया येथे विसर्जन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सत्तेचा गैरवापर करुन देशातील शेतकरी,कष्टकरी,कामगारांना देशोधडीला लावणार्या केंद्रातील मोदी सरकारला धडा शिकविण्याचा इशारा देण्याबरोबर शेतकरी विरोधी कृषी कायदे मागे घेण्यासाठी जी आंदोलने झाली त्यामध्ये जे शेतकरी शहीद झाले त्यांचे बलिदान व्यर्थ न ठरविण्याचा निर्धारही मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या संयुक्त शेतकरी,कामगार महापंचायतीमध्ये रविवारी (28 नोव्हेंबर) एकमुखाने करण्यात आला. शेतकरी आंदोलनाला 6 नोव्हेंबर 2021 रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे.1 वर्षाच्या कालखंडात आंदोलन करणारे देशातील 700 वर शेतकरी शहीद झाले. त्या शेतकर्याच्या अस्थिकलश मुंबईत आणण्यात आला होता.त्यानिमित्ताने रविवारी या अस्थिकलश यात्रेचा समारोप रविवारी आझाद मैदान मुंबई येथे महापंचायतीने करण्यात आला. या महापंचायत मेळाव्यास शेतकरी नेते राकेश टिकैत, ङ्गसंयुक्त किसान मोर्चाफ चे राकेश टिकैत, डॉ.दर्शन पाल, युध्दवीर सिंह, हनान मोल्ला, अतुलकुमार अंजान, राजाराम सिंह,शेकापचे सरचिटणीस आ.जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक,आ.विद्या चव्हाण,किसान नेते राजाराम सिंग (बिहार),कॉम्रेड अशोक ढवळे, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, शेकाप नेते माजी आ. पंडित पाटील,शेकाप कार्यालयीन चिटणीस राजेंद्र कोरडे, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील,कॉम्रेड मिलिंद रानडे, नामदेव गावडे, डॉक्टर अजित नवले,उल्का महाजन,प्रतिभा शिंदे,कामगार नेते विश्‍वास उटगी,कॉम्रेड कृष्णा भोयर,बबली रावत,डॉ.ववेक मॉटोरो,संजय वढावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रायगडातून हजारो शेकाप कार्यकर्ते
रायगड जिल्ह्यातून शेतकरी कामगार पक्षाचे हजारो कार्यकर्ते लाल बावटा डौलाने फडकवत सहभागी झाले होते त्यामुळे संपूर्ण परिसर लाल बावटेमय झाला होता.

महात्मा फुलेंची पगडी
आझाद मैदानात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने शेतकरी कामगार महापंचायत आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये आज देशातील शेतकरी नेत्यांचा महात्मा फुले यांची पगडी देऊन सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकर्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून देशातील शेतकर्यांची व्यथा मांडली होती. रविवारी त्यांचा स्मृतिदिन होता.त्याचे औचित्य साधत मुंबईत शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह योगेंद्र यादव, अतुलकुमार अंजाम, तेजिंदर सिंह विर्क, युद्धविर सिंग, राजाराम सिंग, महिला शेतकरी नेत्या जजबिर नट, नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आदींचा यावेळी महात्मा फुले यांची पगडी देऊन सर्वाचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version