खलाशाचा बुडून झाला मृत्यू

|रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील कासारवेली जेटी येथे रविवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या खालशाचा मृतदेह सापडून आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रामचंद्र कानू नाचरे (45, रा.दाभोळ उजगाव रामाणेवाडी ता. दापोली ) असे मृत्यू झालेल्या खालाशाचे नाव आहे. याबाबत बोट मालक अनिल अनंत शिरगावकर (48, रा.कासारवेली, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, रामचंद्र नाचरे हा त्यांच्या बोटीवर खलाशी म्हणून नोकरीला होता.याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश कांबळे करत आहेत.

Exit mobile version