कामगारांचे पगार सप्टेंबरअखेर देणार

हिल इंडिया कंपनीचे लेखी आश्वासन ; चार दिवसांपासून सुरू असलेले उपोषण स्थगित


| रसायनी | वार्ताहर |

रसायनी येथील भारत सरकारची एचआयएल हिल (इंडिया) लिमिटेडच्या कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी सुरु केलेल्या साखळी उपोषणास गुरुवारी चौथ्या दिवसाअखेर कंपनी व्यवस्थाकडून रात्री आठ वाजता मिळालेल्या लेखी आश्वासनाद्वारे तूर्तास स्थगिती मिळाली आहे. आठ महिन्यांचा थकित पगार मिळावा, अडीच वर्षाची पीएफची रक्कम खात्यात जमा व्हावी, निवृत्त कामगारांची ग्रॅज्युईटीची रक्कम मिळावी, पतसंस्थेची रक्कम मिळावी, अशा प्रमुख मागण्यांसह एकूण 21 मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून हिल (इंडिया) लिमिटेडच्या कामगारांनी साखळी उपोषणास सुरुवात केली. किमान 4 महिन्याचे थकीत वेतन मिळावे ही मागणी सर्वप्रथम चारही कामगार युनियनच्या प्रतिनिधी आणि कामगार नेत्यांकडून होती. मात्र रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या समक्ष सी.एम.डी कुलदीप सिंह यांनी यावर तोडगा काढत पुढील लेखी आश्वासने देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली.

यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात एक महिन्याचा पगार पाठवणार असून आणखी दोन महिन्यांचे पगार या महिन्यातील 30 तारखेपर्यंत देण्यात येईल. गणपती फेस्टिवल ॲडव्हान्स गणेशोत्सव काळात किंवा त्यापूर्वी देण्यात येईल. वैद्यकीय अधिकारी व सुरक्षा कर्मचारी सेवेत लवकरच रुजू होतील, असे लेखी आश्वासनाद्वारे त्यांनी सांगितले आहे. हे संपूर्ण आंदोलन चारही युनियनच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडले असून या आंदोलनाची जबाबदारी कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी चोख रित्या पार पाडली.

Exit mobile version