| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुका सेल्स टीम आयोजित अलिबाग सेल्स प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.11) सकाळी या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून मार्केटींगची कामे केली जातात. या सेल्स टीमला एका छताखाली आणण्यासाठी अलिबाग तालुका सेल्स टीमच्या माध्यमातून गतवर्षापासून प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या वर्षीही हा उपक्रम अलिबाग तालुका सेल्स टीमच्या वतीने खानावमध्ये राबविण्यात येणार आहे. या क्रिकेट स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहे. अंतिम सामन्यानंतर प्रथम क्रमांकाला रोख सात हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला चार हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकाविराला आकर्षक बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.







