| पनवेल | वार्ताहर |
साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून सलूनचालक पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात सलूनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ मोरे हे आकुर्ली येथे सलूनवाला असगर अली मुस्तकीन सलमानी याच्याकडे दाढी करायला गेले होते. असगर याने गळ्यातील चेन खराब होईल, असे सांगितल्याने मोरे यांनी गळ्यातील सोन्याची चेन काढून खिशात ठेवत असताना असगर अलीने चेन मागितली. मोरे यांनी चेन दिल्यानंतर त्याने स्वतःच्या गळ्यात घातली आणि गुटखा खाण्याच्या निमित्ताने बाहेर पडत त्याने सोन्याची चेन घेऊन तेथून पोबारा केला.