। सोलापूर । प्रतिनिधी ।
वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या एका पोलीस कर्मचार्याच्या अंगावर गाडी घालून त्याला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे घडला आहे. या घटनेत या पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. वाळू माफियांवर अशा कारवाईसाठी गेलेल्या प्रशासकीय कर्मचारी आणि पोलिसांवर वारंवार असे हल्ले घडले आहेत,त्याची पुनरावृत्ती झाली. गणेश सोनलकर असं या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचार्याचं नाव आहे. मंगळवेढा येथे वाळू चोरी सुरु असल्याची खबर त्यांना मिळाली होती.त्यानुसार,कारवाईसाठी गेल्यानंतर घटनास्थळी मुजोर वाळू तस्करांनी त्यांच्या अंगावर गाडी घातल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला.