जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांचे प्रयत्न यशस्वी
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
करंजाडे येथील सेकटर 3, कोठारी इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागे असलेले खेळाचे मैदान शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांसाठी खुले करण्यात आले. मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध झाल्याने नागरिकांनी जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद मानले.
शाळेचे मैदान शाळा संपल्यानंतर आणि सुट्टीच्या दिवशी तेथील स्थानिकांना, मुलांना खेळण्यास मिळावे असा सिडकोचा नियम आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी सिडकोच्या या नियमाला बगल दिली जात आहे. कोठारी इंटरनॅशनल स्कूल, करंजाडे या शाळेच्या मागील खेळाचे मैदानदेखील शाळेच्या वेळेव्यतिरिक्त इतर मुलांना खेळण्यासाठी दिले जात नसल्याच्या तक्रारी शिवसेनेचेे विनोद साबळे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी शाळेशी संपर्क साधला आणि शाळेच्या वेळेनंतर हे मैदान येथील स्थानिकांना, मुलांना खेळण्यासाठी मिळावे अशी मागणी केली. अखेर रविवार, दि. 28 डिसेंबर रोजी हे मैदान येथील स्थानिकांना, मुलांना खेळण्यासाठी खुले करण्यात आले.
यावेळी मुलांच्या पालकांनी तसेच मुलांनी शिवसेनेचे आभार मानले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विनोद साबळे, शहरप्रमुख मिरेंद्र शहारे, महिला शहरप्रमुख अंजु सिंह, महिला शहर संपर्कप्रमुख अर्चना शिद्रुक, सेक्टर-4 शाखाप्रमुख राजाभाऊ नलावडे, उप शाखाप्रमुख राहुल सुखसे, उपशाखाप्रमुख दत्ता आतकरे, वैद्यकीय शहरप्रमुख गोरखनाथ नागरगोजे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.







