डाक कामगारांचे द्वितीय अधिवेशन उत्साहात

। पेण । वार्ताहर ।
रामेश्‍वर वैभव, ता. सुधागड येथे राष्ट्रीय डाक कामगार संघटना क्लास 3, पोस्टमन, ग्रुप डी. अ‍ॅन्ड जी. डी. एस. रायगड विभागाच्या वतीने द्विवार्षीक खुले अधिवेशन पार पडले.
सदर अधिवेशनाचे उद्घाटन आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते झाले. सदर अधिवेशना करीता विनोद जाधव अध्यक्ष क्लास 3, सुनील करदेकर अध्यक्ष क्लास 4 व जनार्दन देशमुख, अध्यक्ष जी. डी. एस. व तिन्ही विभागाचे सचिव उपस्थित होते. सदरील अधिवेशनात कर्मचार्‍यांनी काम करीत असताना उद्भवणार्‍या समस्या धैर्यशील पाटील व युनियनच्या तिन्ही विभागांच्या अध्यक्षांसमोर मांडल्या.
धैर्यशील पाटील यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेऊन कामगारांना येणार्‍या अडचणी सोडविण्याबाबत जेव्हा कधी माझी गरज लागेल तेव्हा तुमच्यासोबत राहून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच आज व्हॉटस् अप, फेसबुकच्या दुनियेत देखील डाकघर कामगार आपली सेवा प्रामाणिक करत आहेत. त्यामुळे त्यांची समस्या सोडविणे ही माझी जबाबदारी समजतो म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल तेव्हा फक्त आवाज द्या मी आपल्यासाठी उपलब्ध होईल असे अभिवचन दिले.

Exit mobile version