| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या मंगळवार, दि.19 रोजी पोर्ट एलिझाबेथ येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु झाला होता. पण, दुसरा सामना तीन तास उशिराने म्हणजेच, दुपारी 4.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक 4 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर चाहत्यांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. दुसरीकडे, थेट प्रवाह डिस्ने प्लस हॉटस्टारवर असेल.
दुसरा सामना तीन तास उशिरा
