शेकापच्या माध्यमातून उद्यापासून मोफत लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

कोरोनाची साखळी मोडण्यासाठी लस घेणे खूप गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असून लॉकडाऊन केले तर लोकांवर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे नागरिकांचे लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. अशातच लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. गावोगावी लस पोहचलेली नाही. हे लक्षात घेऊन शेतकरी कामगार पक्षाने दि. 1 ते 8 सप्टेंबर रोजी मोफत लसीकरण मोहिमेस सुरुवात केली. यावेळी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी अत्यंत चोख नियोजन करुन लसीकरणाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पाडला. याच पार्श्‍वभूमतीवर आता दि. 15 सप्टेंबरपासून मोफत लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे.
दि. 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीत शेकापतर्फे तोडकरी रुग्णालयात नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात आले होते तसेच मोफत बस सुविधा सुद्धा देण्यात आली होती. ऑफलाईन पद्धतीची असणारी ही लसीकरण मोहिम गावपातळीनुसार सुरु करण्यात आली होती. दुसर्‍या टप्प्याचेही योग्य नियोजन करण्यात आले आहे. रोज एक किंवा दोन गाव असे 200 लोकांना लस देण्यात येणार आहे.
योग्य नियोजनासाठी प्रत्येक गावात प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिली. दुसर्‍या टप्प्यात पहिल्या दिवशी 15 सप्टेंबर रोजी वरसोली व थळ बाझार, 16 सप्टेंबर रोजी वेश्‍वी व गोंधळपाडा, दि. 17 रोजी चौल, वरंडे, तर 18 सप्टेंबर रोजी कावीर, बामणगाव, तळ, बेलोशी, महाजने या गावातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यानंतर तिसर्‍या व चौथ्या टप्प्याचेही नियोजन करण्यात येणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

संपर्क प्रतिनिधी-
सुरेश घरत (वरसोली) : 9158584200
सुकन्या साखरकर (थळ बाझार) ः 8459762678
प्रफुल्ल पाटील (वेश्‍वी): 9922393772
भाग्यश्री कदम (गोंधळपाडा): 8446196132,
नरेश पडियार : 9226033903
संदीप भाई घरत (चौल, वरंडे): 9518350554
राजू म्हात्रे (कावीर, बामणगाव, तळ): 9271399096
निनाद वारगे (बेलोशी, महाजने): 9222182011,
अरविंद पाटील: 9637556285

Exit mobile version