महावृक्षरोपणाचा दुसरा टप्पा पूर्ण

| रोहा | वार्ताहर |

बळीराजा फाऊंडेशनचा उपक्रम, तरुणांचा मोठा सहभाग, निसर्ग फुलविण्याचा संकल्प रोहा, धाटाव प्रामुख्याने शेती, निसर्गावर काम करण्यासाठी सक्रीय असलेल्या बळीराजा फाऊंडेशनचा विभागीय महावृक्षारोपणाचा दुसरा टप्पा रविवारी पूर्ण झाला. तळाघर, बोरघर, लांढर, वाशी गावातील रस्ता दुतर्फा तलाव, मैदान, बंधारा परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. बळीराजा फाऊंडेशनने पुढाकार घेतलेल्या वृक्षारोपण उपक्रमात विभागातील तरुणांनी मोठा सहभाग घेतला.

निसर्ग फुलविण्याचा या ब्रीदवाक्य संकल्पनेतून रविवारी पूर्ण विभागात महा वृक्षरोपणाचा जागर केला. वृक्षरोपण कार्यक्रमाला विभागातील युवा नेतृत्व, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तळाघर येथील धबधबा परिसर, बोरघर, लांढर, वाशी हद्दीतील रस्ता दुतर्फा, तलाव, मैदान सभोताली वृक्षारोपण करण्यात आले. लांढर येथे उपस्थित अन्शूलचे मॅनेजर लक्ष्मण शिट्याळकर, युवा नेतृत्व जयवंत मुंढे, उद्योजक राम नाकती, मुकेश भोकटे व अन्य मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लक्ष्मण शिट्याळकर, जयवंत मुंढे, राम नाकती, मुकेश भोकटे, अनिल भगत, दिनेश पाशिलकर, शशिकांत मोरे, सुरेंद्र निंबाळकर, विलास जाधव, विठ्ठल मोरे, राजेंद्र जाधव, सतीश भगत, कृष्णा बामणे, अनंत मगर व तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version