। नवीन पनवेल । वार्ताहर ।
सुरक्षारक्षकाला तोंडाला रुमाल बांधून 18 ते 24 वयोगटातील तरुणांनी प्लास्टिक पाईपने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अनोळखी इस्मान विरोधात गुन्हा दाखल केला.
पोपट आव्हाड हे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुपरवायझर आहेत. ते एनएमएमटी बस आगार आसुडगाव येथे काम करतात. काही सुरक्षारक्षकांनी त्या ठिकाणाहून आव्हाड यांची बदली व्हावी यासाठी दोन महिन्यांपूर्वी तक्रार अर्ज केल्याचे त्यांना समजले होते. 2 जानेवारी रोजी ते मोटर सायकलने घोटकॅम्प येथील घरी जात असताना इंटरनेट बारच्या समोरून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोडच्या ब्रिज जवळ आले असता तीन ते चार अनोळखी इसम तोंडाला रुमाल बांधून उभे होते. त्यांनी प्लास्टिकचा पाईप फेकून मारला तो त्यांच्या हाताला लागला. त्यानंतर त्यांनी पळत येऊन आव्हाड यांना प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली. 3 जानेवारी रोजी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.