| खांब | वार्ताहर |
कोलाड बीटाचे माजी बिटविस्तार अधिकारी रत्नाकर कनोजे यांचा सेवापूर्ती सोहळा रा. जि प.शाळा खरबाचीवाडी वस्ती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोलाड बीटाचे माजी बीट विस्ताराधिकारी प्रमोद चवरकर उपस्थित होते. येरळ केंद्राच्या वतीने सत्कारमूर्ती – माजी बीट विस्तार अधिकारी रत्नाकर कनोजे व माजी बिटविस्ताराधिकारी प्रमोद चवरकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक विजय भोसले यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर गजानन जाधव, प्रशांत वाघचौरे, बादल जाधव आणि येरळ केंद्राचे केंद्रप्रमुख कुंदन जाधव यांनी आपले मनोगतातून रत्नाकर कनोजेंबद्दल अनुभव व्यक्त केले. तसेच, माजी बीट विस्तार अधिकारी प्रमोद चवरकर यांनीही रत्नाकर कनोजे यांच्या विषयी आपल्या विनोदी शैलीतून मनोगत व्यक्त केले. रत्नाकर कनोजे यांनी आपला जीवन प्रवास आपल्या मनोगतातून व्यक्त करून उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर केंद्रप्रमुख कुंदन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली येरळ केंद्राची शिक्षण परिषद घेण्यात आली. यावेळी सीमा गायकवाड, सुनिता वालेकर, सुषमा पवार यांनी विविध विषयांवर उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.