रायगडकरांवर दरडीचे सावट

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात पावसाळा सुरु झाला की नैसर्गिक आपत्ती घडण्याच्या शक्यतांना आपसूकच दुजोरा मिळतो. पावसामुळे येणाऱ्या महापुरांमुळे निर्माण होणारी परिस्थिती भयावह असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यात जिल्ह्यात होणाऱ्या भूस्खलनाचा फटका नेहमीच जिव्हारी बसल्याचे अनेकदा रायगडकरांनी अनुभवले आहे. गेल्या सोळा वर्षात दरड कोसळण्याच्या मोठ्या अकरा घटना घडून यात 350 हुन अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक सर्वेक्षणात 14 तालुक्यातील 392 गावे आजही दरडीच्या सावटाखाली आहेत. यातील 71 गावे ही अती धोकादायक दरड क्षेत्रात येत आहेत. दरडग्रस्त गावांपैकी 91 गावात सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली बसविण्यात आलेली आहे.

महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, माणगाव, पाली, म्हसळा, मुरूड, अलिबाग या जिल्ह्याच्या दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये अनेक गावे डोंगर आणि दुर्गम भागात वसलेली आहेत. पनवेल, कर्जत, खालापूर, पेण या तालुक्यापेक्षा दक्षिणेकडील भागात दरड कोसळून दुर्घटना अधिक झालेल्या आहेत. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत कोंडिवते, जुई, रोहण, कोतवाल, लोयर चव्हाणवाडी, तळीये, सुतारवाडी, केवनाळे, इर्शालवाडी या ठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत.
2023 मध्ये जिल्ह्यात 211 गावांना दरडीचा धोका दिला होता. 2024 मध्ये भौगोलिक सर्वेक्षणात 103 गावांना दरडीचा धोका देण्यात आला होता. मात्र 2025 मध्ये 392 गावे दरडीच्या सावटाखाली आली आहेत. गतवर्षी पेक्षा चौपट संख्या वाढलेली आहे. जंगल तोड, माती उत्खनन, डोंगरावर बांधकाम यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे दरड प्रवण क्षेत्र गावातील नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासन खबरदारी घेत आहे. यंदाच्या पावसाळ्यात दरड दुर्घटना होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन काळजी घेतली जात आहे. तेवढीच दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मनुष्यहानी टाळणे शक्य होणार आहे.

91 दरडग्रस्त गावात पीए सिस्टम
जिल्ह्यातील 392 दरड ग्रस्त गावापैकी 1 ते 3 गटात मोडत असलेल्या अतिधोकादायक 91 गावात पी ए सिस्टम म्हणजे सार्वजनिक उदघोषणा प्रणाली बसविण्यात आलेली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाच वेळी 91 ठिकाणी हवामान विषयक पूर्व सूचना देण्यात येतील. लाईव्ह किंवा रेकॉर्डस संदेश देता येईल. सायरन वाजविला जाणार, कोणत्याही ठिकाणाहून संदेश देण्यासाठी ऑपरेट करणे शक्य होणार आहे.

भौगोलिक सर्वेक्षणात 392 गावे दरडीच्या छायेत

तालुका गावे वर्गवारी 1234
महाड 12171461105
पोलादपूर
14043240187
रोहा
200241321
म्हसळा
1431631
माणगाव 2218741
पनवेल
300300
खालापूर
1224411
कर्जत
510400
सुधागड 900513
श्रीवर्धन 1204413
तळा300300
अलिबाग 902131
मुरुड 901311
पेण 1301560
एकूण 39218711594922


जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने दरडग्रस्त 400 गावामध्ये किट वाटप करण्यात आलेले आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे दरडग्रस्त गावाकडे अधिक लक्ष केंद्रित केले असून जिल्हाधिकारी यांनी उपाययोजना करण्याच्या सूचना सबंधित विभागाला दिल्या आहेत.त्याचबरोबर दरडग्रस्त गावांतीलनागरिकांना सावधगिरीचा इशारा देखील देण्यात आला आहे.

सागर पाठक,
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

Exit mobile version