घाटावरील मेंढपाळाचे कोकणाकडे कूच

चार्‍यासाठीची पायपीट सुरूच; शेतकर्‍यांकडून पैसे, अन्नाची होत व्यवस्था
महाड । वार्ताहर ।
महाबळेश्‍वरच्या वरच्या विभागात मोठ्या प्रमाणात धनगर समाज हा अस्तित्वात आहे. दरवर्षी हे मेंढपाळ मेंढ्यांना चार्‍यासाठी कोकणात घेऊन येत असतात. यंदाही मेंढपाळाचा हा कळप मेंढ्यांसोबत कोकणात दाखल झाला आहे.
भोर विभाग मार्गे येणारे खंडाळा, फलटण, लोणंद आणि बारामती या विभागात मोठ्या प्रमाणात धनगर समाज अस्तित्वात आहे. यांचा व्यवसाय मेंढ्या पाळणे हा असतो. अनेक धनगरांकडे शेकडोच्या गणतीत मेंढ्या आहेत. या समाजातील काही लोक इतरांच्याही मेंढ्या पाळण्यासाठी घेत असतात. मात्र घाट विभागात या मेंढ्यांसाठी तेवढा मुबलक चारा नसल्याने हा समाज दरवर्षी कोकणात येतो. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने वर्षाचे बारा महिने नदी नाले पाण्याने वाहत असून सर्व डोंगर मे महिन्यांपर्यंत हिरवे गारच असतात. त्यामुळे दया मेंढ्यांसाठी जवळपास सात महिने मुबलक चारा उपलब्ध होतो. तसेच मेंढपाळ शेतकर्‍यांच्या शेतात मेंढ्या बसवण्यासाठी मोबदल्यात पैसा आणि भात घेतात. त्यामुळे त्यांचा गुजराण होते.
चौकट
जूनच्या सुरूवातील पुन्हा परतीचा प्रवास
कोकणातील भात कापणीनंतर मेंढ्यांसोबत लहान मुले तसेच सर्व कुटुंबकबीला घेऊनच कोकणात सात महिने वास्तव्य करतात. भात कापणीनंतर मोठ्या प्रमाणात हिरवागार चारा असल्याने या मेंढ्यांचे ठिकठिकाणी कळपच्या कळप दिसून येतात. कोकण भागातील महाड भागात दाखल होऊन पोलादपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात मेंढ्यांना घेऊन फिरत असतात.

Exit mobile version