| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरातील व्यापाऱ्यांच्या हक्कांसाठी, एकजुटीसाठी आणि स्वाभिमानासाठी ‘शिवतेज व्यापारी असोसिएशन’ची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. या नव्या संघटनेचा नामफलक अनावरण सोहळा शुक्रवारी (दि.23) सायंकाळी साडेपाच वाजता राजपालनाका येथील राम मंदिरात पार पडणार आहे. या नामफलक अनावरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या हस्ते अधिकृतपणे अनावरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच, ही असोसिएशन माजी आमदार मनोहर भोईर आणि माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिवतेज व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने करण्यात आले असून, अरुण पाठारे, फते खान, विनोद कोठारी आणि जयेश मेहता हे संयोजक म्हणून कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळत आहेत.







