भावाने आणि वाहिनीनेच केली हत्या
। पुणे । प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर तिची ओळख लपविण्यासाठी तिच्या मृतदेहाचे तुकडे करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिला होता. या हत्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. त्या महिलेच्या भाऊ आणि वहिनीनेच तिची हत्या केली होती आणि मृतदेहाचे तुकडे करुन नदीत फेकून दिले होते.
पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाणाच्या हद्दीत मुळा मुठा नदीमध्ये शीर, हात-पाय नसलेला मृतदेह आढळला होता. त्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. तो मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा असल्याची माहिती समोर आली आहे. तिचा सख्खा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांनी तिची हत्या केली. पुण्यातील पाटील इस्टेट भागतील एका खोलीवरुन भाऊ अन् बहिणीत वाद सुरु होता. ही खोली सकीनाच्या नावावर होती. सकीनाचा भाऊ अशपाक आणि वहिनी हमीदा तिला घरातून निघून जाण्यास सांगत होते. मात्र ती जात नसल्याने त्यांनी तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन नदीला पूर आला असताना त्यात मृतदेह फेकून दिला.
त्यानंतर सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती तिच्या भावाने शेजाऱ्यांना दिली. मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अशपाकची कसून चौकशी केली असता या हत्येचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलीसांनी अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केली आहे.