। पनवेल । वार्ताहर ।
शहरातील नाट्यगृहासमोरील प्रशासकीय भवनाचे काम सुरू आहे. या ठिकाणी दगडाने भरलेला सहा चाकी आयशर कंपनीचा हायवा पलटी झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सहा चाकी आयशर कंपनीचा हायवा प्रशासकीय भवनाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दगड टाकण्यासाठी आला होता. यावेळी काम चालू असलेल्या ठिकाणी वाहनाचे चाक मातीत रुतले आणि हे वाहन पलटी झाले. यात वाहनाचे नुकसान झाले असून दगड खाली कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या वाहनाला बाहेर काढण्यासाठी क्रेनचा आधार घेण्यात आला.







