। मुंबई । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते