। कुडाळ । प्रतिनिधी ।
शहरातील महालक्ष्मी मंदिर नजीकच्या सोसायटीमध्ये एकाचवेळी तब्बल 20 वीजमीटर शॉर्टसर्किटमुळे जळाल्याने एकच धावपळ उडाली. सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. वीज कंत्राटी कर्मचार्याने या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या तीन मुलांना सुखरूप खाली आणल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी शहरातील महालक्ष्मी मंदिर नजीकच्या इमारतीमधील विजमीटरचे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे एकाच वेळी 20 वीजमीटर जळून खाक झाले. ते मीटर पूर्णतः जळून खाक झाले. त्यामुळे सर्वत्र धूर पसरला आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली.
कुडाळला एकाचवेळी 20 वीजमीटरमध्ये शॉर्टसर्किट
