| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2021 चं 14 वं सत्र पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आयपीएल 2021 च्या बायो बबलमध्ये कोरोनाने प्रवेश केल्यामुळे आयपीएल मधेच थांबवली गेली होती. पण आता आयपीएल लीग पुन्हा एकदा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या सामन्या अगोदर अमिराती क्रिकेट बोर्डाचे महासचिव मुबशीर उस्मानी यांनी आयपीएलच्या दुसर्या सत्रात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे.असे सुचित केले आहे.
महासचिव मुबशीर उस्मानी म्हणाले, आयपीएलमध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी या संदर्भात आम्ही बीसीसीआय आणि आयसीसी यांच्याशी चर्चा करणार आहे. परवानगी मिळाली तर किती प्रेक्षकांना परवानगी द्यावी तसेच प्रेक्षकांसाठी काय नियम असतील या संदर्भात चर्चा करणार आहे. आमची इच्छा आहे की, मक्रिकेटप्रेमींनी मॅच आनंद स्टँड्समध्ये बसून घ्यावाफ. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युएई सरकारने आयपीएलमधील सामने पाहण्याकरता मैदानाच्या क्षमतेनुसार 60 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. परंतु बीसीसीआयने अद्याप यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही.