| अलिबाग | प्रतिनिधी |
पीएनपी प्रभाविष्कार अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेतील एक भाग म्हणजे क्रीडा स्पर्धा सालाबादप्रमाणे या वर्षी ही क्रीडा ज्योत प्रज्वलित करून रॅली काढण्यात आली. पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गीते यांच्या हस्ते संस्थेचे मुख्य कार्यालय येथे क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्रा. रविंद्र पाटील होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल, स्टेट बोर्ड मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, बी. एड. कॉलेजच्या प्रा. ऋतिषा पाटील, क्रीडा प्रशिक्षक तेजस म्हात्रे इतर मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रॅलीचा सांगता समारंभ राज्य क्रीडा मार्गदर्शक निलकंठ आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.






